आघाडीत बिघाडी झाल्याची अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे मात्र अहमदनगर येथे राष्ट्रवादीने शिवसेनेचे नगरसेवक फोडले आणि ते सर्व जण राष्ट्रवादीत सामील झाले. या प्रकरणानंतर उद्धव ठाकरे कमालीचे आक्रमक झाले आहेत. त्यांनी अजित पवारांना मोठा इशारा दिला आहे.
उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ‘आमचे नगरसेवक परत पाठवा, असा संदेश दिला आहे अन्यथा वाईट परिस्तिथी होईल असा इशारा दिला त्यामुळे आता शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेदही चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत अजित पवार यांना संपर्क साधत निरोप कळवला.
पारनेर तालुक्यातील शिवसेनेचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्याची रणनीती चुकीची आहे. सत्तेतील मित्रपक्ष एकमेकांचे लोकप्रतिनिधी फोडायला लागले, तर योग्य संदेश जाणार नाही. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक परत शिवसेनेत पाठवावेत, असा निरोप उद्धव ठाकरेंनी अजित पवार यांना कळवला.
महाविकास आघाडीत मित्रपक्ष असतानाही राज्यात इतर ठिकाणी मित्रपक्षांच्या नेत्यांनाच आपल्या पक्षात घेण्याच्या राष्ट्रवादीच्या निर्णयाबद्दल शिवसैनिकांकडून चांगलीच नाराजी व्यक्त केली जात होती. याबाबत उद्धव ठाकरे यांच्याकडे खूप तक्रारी आल्याचीही माहिती आहे.