Home महाराष्ट्र मुखमंत्री ठाकरेंचा भाजपाला पुन्हा एक जोरदार धक्का!

मुखमंत्री ठाकरेंचा भाजपाला पुन्हा एक जोरदार धक्का!

0

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यापासून उद्धव ठाकरे यांनी भाजपचे निर्णय मोडीत काढण्याचा जणू धडाकाचं लावला आहे. सत्ते वादातून वेगळे झालेले भाजप व शिवसेना हे मित्रपक्ष आता एकमेकांचे शत्रूपक्ष झाले आहेत. शिवसेनेनं राष्ट्रवादी सोबत मिळून सत्ता स्थापन केली परिणामी बहुमत असूनही भाजपला विरोधी पक्षाची भूमिका घ्यावी लागली. सुरवातीला उद्धव ठाकरे यांनी अरे कारशेडला स्थगिती देत भाजपला धक्का दिला व आता भाजपने महामंडळावर केलेल्या नियुक्त्या मुखमंत्री उद्धव ठाकरे यांनी रद्द केल्या आहे.

पूर्वीचे मित्रपक्ष आता शत्रूपक्ष झाल्याने महमंडळावर नियुक्त झालेल्या नेत्यांना चांगलाच जोरदार फटका बसणार आहे. सदर नियुक्त्या रद्द झाल्या सल्या तरी शिर्डी साईबाबा मंदिर, सिद्धिविनायक मंदिर व पंढरपूर मंदिर येथील नियुक्त्या कायदेश असल्याने येथील पदाधिकारी आपला कार्यकाळ पुर्ण करू शकतात. अशी माहिती मिळत आहे.