Home महाराष्ट्र पावसामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पावसामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांत नुकसान झाले आहे. या परतीच्या पावसात अनेकांच्या शेती पाण्याखाली गेल्याने पिकांचे नुकसान झाले तसेच कित्येक जनावरे वाहून गेली. म्हणून पूरग्रस्त शेतकऱ्यांचे शेतीतील पिकांचे व त्या भागातील लोकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजपासून म्हणजेच १९ ऑक्टोबरपासून दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत.

या दौऱ्यात ते पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागांना भेटी देणार आहेत. आज पश्चिम महाराष्ट्र व उद्या मराठवाडा असा त्यांचा दौरा असेल. मीडिया न्यूजनुसार या पाहणीतून मुख्यमंत्री नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेतील व त्यानुसार मदत जाहीर करण्यावर निर्णय घेतला जाईल.