Home महाराष्ट्र विधानसभेसाठी राज्यात काँग्रेसच्या ११० उमेदवारांची यादी तयार

विधानसभेसाठी राज्यात काँग्रेसच्या ११० उमेदवारांची यादी तयार

0

२०१९ च्या विधानसभा निवडणुकांना एका महिन्याहूनही कमी वेळ राहिला आहे. अशातच काँग्रेस पक्षाने ११० उमेदवारांची यादी पक्की केली असून लवकरच ही यादी जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहेत. यावर्षी काँग्रेसने एका कुटुंबातील एकाच सदस्याला निवडणूक लढवता येईल असे सांगितले आहे.

मीडिया न्यूजनुसार महाराष्ट्राचे प्रभारी व काँग्रेसचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खरगे यांनी काल रात्री काँग्रेस निवड समितीने पुष्टी केलेल्या उमेदवारांची नावे या यादीत आहेत की नाही हे तपासले. परंतु सद्ध्या तरी ही यादी सर्वांसमोर आलेली नाही. पृथ्वीराज चव्हाण सातारा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीबद्दल अजून कुठलीही पक्की बातमी समोर आलेली नाही. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार ईडीच्या खटल्यात गुंतल्यामुळे आघाडीचे जागावाटप अद्याप टांगणीला आहे. याबद्दलची बातमी देखील लवकरच समोर येईल अशी शक्यता आहे.