Home आरोग्य जून ३० पर्यंत कोरोणाची औषधे दुकानात उपलब्ध : राजेश टोपे

जून ३० पर्यंत कोरोणाची औषधे दुकानात उपलब्ध : राजेश टोपे

0

कोरोनवरील उपचाराच्या कोरोनाकरील, रेमेडेसीकीर, फॅबीपीरावीर आणि टॅझीलोझुमा ही प्रभावी औषधे या महिन्याच्या ३० तारखेपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यात उपलब्ध होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. याशिवाय कंटेनमेन्ट झोनमध्ये नेमका किती जणांना संसर्ग झाला आहे हे शोधण्यासाठी ऍन्टीबॉडीज चाचण्या करण्याचा निर्णय सुद्धा सरकारने घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.

अँटीबॉडीज् चाचण्या करण्याबाबत अनेक वाद असल्याने चाचणी करोना निदानासाठी वापरता येणार नाही असे स्पष्ट करत भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने (आयसीएमआर) सर्वेक्षणासाठी वापरण्याची परवानगी दिली. त्यावेळी डॉक्टरांसह आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या चाचण्या करण्याचा निर्णय मुंबई पालिकेने घेतला होता. परंतु आयसीएमआरच्या आदेशानंतर पालिकेनेही चाचण्या स्थगित केल्या. यालाही आता महिना उलटत आल्यावर सर्वेक्षणासाठी चाचण्या वापरण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे.

कोरोना व्हायरसवरील प्रतिबंधात्मक औषध म्हणून होमिओपॅथीक अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांसाठीची मागणी सुद्धा वाढली आहे. आर्सेनिकम अल्बम 30 गोळ्या खरेदी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं नगरसेवकांना त्यांच्या विकास निधीचा वापर करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.होमिओपॅथिक औषधाने कोविड 19 विरूद्ध प्रतिबंधात्मक औषध वापरासाठी शिफारस केली. अर्सेनिक अल्बम 30 या औषध वितरणास महापालिकेनं प्रायोगिक तत्त्वावर परवानगी दिली होती.