Home महाराष्ट्र मुंंबई, पुणे आणि नागपूर नंतर बुलढाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढती

मुंंबई, पुणे आणि नागपूर नंतर बुलढाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढती

0

बुलडाणा जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा आज पंधरा इतका झाला आहे. वाढते रुग्ण हे बुलढाणा जिल्हा वासियांच्या चिंतेत भर घालणारे आहेत. घाटाखालील शेगाव शहरात आत्तापर्यंत तीन तर खामगाव तालुक्यामधील चितोडा गावात दोन रुग्ण आढळून आल्याने नागरिकांनी आता अधीक जागरूक राहण्याची व काळजी घेण्याची गरज आहे

८ एप्रिल २०२० पर्यंत ९६ भारतीय नागरिकांना त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले होते. गृह विलगीकरणातून १४ दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या १० नागरिकांची आज डिस्चार्ज करण्यात आली. एकूण ८६ नागरिक ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात संस्थात्मक विलगिकरणात आज १६ व्यक्तींना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. संस्थात्मक विलगीकरणात आज एकूण १०२ नागरिक आहेत.
विलगिकरण कक्षात सध्या २४ व्यक्ती दाखल आहेत. त्यामध्ये खामगाव मध्ये ५, शेगाव १ व बुलडाणा येथे १० व्यक्तींचा समावेश आहे. घरीच स्वतंत्र खोलीत १४ दिवस निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या आजपर्यंत ५७ नागरिकांची निरीक्षणातून मुक्तता करण्यात आली. तसेच संस्थात्मक विलगीकरनातून १४ दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर आजपर्यंत ९५  नागरिकांना निरीक्षणातून घरी सोडण्यात आले. तसेच सध्या जिल्ह्यातील २४ नागरिक आयसोलेशन कक्षात दाखल आहेत. अलगीकरणातून आजपर्यंत ३० व्यक्तींना सुट्टी देण्यात आली असून यामध्ये बुलडाणा येथील १४, शेगांव ५ व खामगांव येथील ११ व्यक्तींचा समावेश आहे.

आतापर्यंत प्रयोगशाळेत जिल्ह्यातून पाठवण्यात आलेल्या नमुना मधून १५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत ही आकडेवारी बुलढाणा जिल्ह्याची चिंता वाढविणारी आहे. नागपूर प्रयोग शाळेमध्ये पाठवलेल्या नमुन्यांपैकी २१ जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आलेत आल्या नंतर दिलासादायक बातमी हाती आली होती. मात्र काल उशिरा रात्री आणखी ३ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत आणि पुन्हा चिंतेत भर पडली. यात दोन शेगाव तर एक खामगाव तालुक्यातील चितोडा येथील आहे. शेगाव शहरात आता ३ तर खामगाव तालुक्यातील चितोडा येथे २ रुग्ण झाले आहेत.