Home आरोग्य कोरोनाबाधित रुग्णांना प्लाझ्मा बॅग्स मिळणार साडेपाच हजारात!

कोरोनाबाधित रुग्णांना प्लाझ्मा बॅग्स मिळणार साडेपाच हजारात!

0

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी लागणाऱ्या प्लाझ्मा थेरपीसाठी २०० मिलीच्या प्लाझ्मा बॅग्स आता प्रत्येकी साडेपाच हजार रुपये या किमतीला मिळणार आहेत. यापेक्षा अधिक किंमत आकारणाऱ्या रक्तपेढ्यांना अतिरिक्त किमतीची परतफेड रुग्णांना करावी लागेल तसेच त्या रक्तपेढ्यांचा परवाना रद्द केला जाईल असेही टोपेंनी सांगितले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोरोनाबधितांवर ट्रायलसाठी प्लाझ्मा थेरपी निःशुल्क वापरली जात आहे.

परवडणाऱ्या दरात कोरोना रुग्णांना प्लाझ्मा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्लाझ्माच्या प्रति डोसचा दर ठरवण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेची तज्ञ समितीची नेमणूक करण्यात आली होती. या समितीने प्लाझ्मा अफेरसिस पद्धतीने प्लाझ्मा संकलित करण्यासाठी लागणार खर्च व इतर बाबींचा अभ्यास करून एका डोसचा दर निश्चित केला. त्यानुसार २०० मिली प्लाझ्मा बॅगसाठी आता साडेपाच हजार रुपये हा दर आकारण्यात येणार आहे. ‘प्रभात’च्या मीडिया न्यूजमधून ही माहिती मिळाली.