Home महाराष्ट्र कोरोनामुळे CET परीक्षा पुढे ढकलण्यात येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने केला खुलासा!

कोरोनामुळे CET परीक्षा पुढे ढकलण्यात येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने केला खुलासा!

0

सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्र अभियांत्रिकी पूर्व परिक्षेविषयी याचिका दाखल करण्यात आली होती ती याचिका कोरोना प्रादुर्भावामुळे आलेल्या संकटामुळे CET परीक्षा पुढे ढकलण्यात यावी याबाबत होती परंतू ती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

आताच देण्यात येण्याच्या JEE आणि NEET परीक्षा घेण्याच्या निर्णयामुळे त्यांनी ही याचिका फेटाळून लावली आहे असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अशोक भूषण आणि आर. सुभाष रेड्डी यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली.

यामध्ये ते बोलले की त्यांनी JEE व NEET परीक्षा घेण्याची परवानगी दिली आहे परंतु , आता एकाच राज्यासाठी तो असा नियम लावू शकत नाही. कोरोनामुळे अनेक क्षेत्रांचे वर्ग बिघडले आहेत. तर काही परीक्षा अनेक वेळा पुढे ढकलल्या गेल्यामुळे न्यायालयात JEE व NEET परीक्षेबाबत मुद्दा उपस्थित झाला होता त्यामुळे मागच्या आठवड्यात त्यांनी परीक्षेला परवानगी दिली आहे.