Home महाराष्ट्र मुंबईत कोरोनामुळे नाही तर मराठा समाजाच्या असंतोषामुळे जमावबंदी! – चंद्रकांत पाटील

मुंबईत कोरोनामुळे नाही तर मराठा समाजाच्या असंतोषामुळे जमावबंदी! – चंद्रकांत पाटील

0

मुंबई मध्ये आज मध्यरात्रीपासून कलम 144 लागू करून जमावबंदी लागू करण्यात येत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव याचे कारण असून हे खरे कारण वाटत नाहीये असा संशय येत आहे असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्‍हटले आहे.

राज्य सरकारला माहित आहे की मराठा आरक्षणामध्ये आपण अयशस्वी झालो आहेत.तर मराठा समाजामध्ये असंतोष निर्माण होऊन आंदोलन करू नये अशी भीती वाटत असून कोरोनाचे कारण पुढे करून राज्य सरकारने मुंबईमध्ये जमावबंदी लागू केली आहे.

मराठा समाजाचा आवाज आधीच कोंडलेला असून आता तो पूर्णपणे दाबण्यासाठी महाभकास आघाडी सत्तेचा दुरुपयोग करत आहे. ते बोलले की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सत्तेच्या मोहापलीकडे काहीच दिसत नाहीये परंतु त्यांनी मराठा समाजाचा कितीही आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी हे शक्य नाहीये.क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही, असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.