Home महाराष्ट्र परप्रांतीय गेले म्हणून रोजगार वाढणार ? दोन दिवसात पाच हजाराहून जास्त मजूर...

परप्रांतीय गेले म्हणून रोजगार वाढणार ? दोन दिवसात पाच हजाराहून जास्त मजूर मुंबईत परत दाखल!

0

परप्रांतीय गेले आता आपल्याला संधी असं म्हणणं संपत सुद्धा नाही तोच ते लोक पुन्हा मुंबईच्या वाटेने निघाले आहेत. LockDown मूळे आलेल्या अडचणींमुळे गावाकडे जाणाऱ्या परप्रातीयांच्या प्रवासाची चर्चा रेल्वेने १ जूनपासून सुरू केलेल्या विशेष गाडय़ांमधून अनेकांनी परप्रांतातून मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू सुद्धा केला आहे. १ आणि २ जून या दोन दिवसात मुंबईत पश्चिम आणि मध्य रेल्वेने साडे पाच हजारपेक्षा जास्त प्रवासी मुंबई आणि आजुबाजूंच्या उपनगरात दाखल झाले. मंगळवारीही रात्री उशिरार्पयंत विशेष गाडय़ा मुंबईत येत होत्या.

कुठून किती मजूर मुंबईत दाखल?

अहमदाबाद ते मुंबई सेंट्रल – सोमवार- प्रवाशी१५११
मंगळवार- प्रवाशी ११५४

दिल्ली ते मुंबई सेंट्रल – ४३३

जोधपूर ते वांद्रे टर्मिनल्स – १४१६

हैद्राबाद ते CSMT – ६००

महाराष्ट्रातील कामगारांना आणि कष्टकर्यांना आता परप्रांतीय मजूर गेल्यामुळे प्रचंड संधी उपलब्ध आहेत रोजगार वाढतील असे वाटत असताना परत एकदा मोठ्या संख्येने हे मजूर मुंबईच्या दिशेने वाटचाल करू लागल्याने मराठी माणसाच्या रोजगाराची स्वप्ने हवेत विरतात की काय असे वाटू लागले आहे!