Home महाराष्ट्र मुंबई महानगर पालिकेचा महत्वाचा निर्णय; यावर्षी घरगुती गणपती विसर्जन होणार कृत्रिम तलावांमध्ये!

मुंबई महानगर पालिकेचा महत्वाचा निर्णय; यावर्षी घरगुती गणपती विसर्जन होणार कृत्रिम तलावांमध्ये!

0

कोरोनाच्या आलेल्या संकटामुळे यावर्षी गणेश विसर्जनात सुद्धा जास्त गर्दी करता येणार नाही. यावर्षी चा गणेशोत्सव हा साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर चौपाटी वर होणारी गर्दी टाळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुंबई महानगरपालिकेकडे दादर- माहीम परिसरात कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी अशी मागणी करण्यात आली होती. तर त्या मागणीला महानगरपालिकेने परवानगी दिली आहे.

मुंबई महानगर पालिकेने घरगुती असलेले गणपती त्या कुत्रीम तलावात विसर्जित करण्याचे आवाहन केले आहे. आज मनसेचे उपाध्यक्ष व दादर-माहीम विधानसभा विभागाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी प्रत्यक्षात कृत्रिम तलावांची संख्या कमी असल्याचे लक्षात घेऊन परिमंडळ 2 चे पालिकेचे सहआयुक्त नरेंद्र बर्डे आणि जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांची भेट घेऊन त्यांना परिस्थिती बाबत माहिती दिली आहे.