महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या संघर्षात भाजपवर शिवसेनेच्या वतीने सर्वांत जास्त टिकाशास्त्र कुणी चालवले असेल तर ते खासदार संजय राऊत यांनी. सध्या ते रुग्णालयात आहेत. त्यांच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेज आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अँजिओप्लॅस्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे व सध्या त्यांना आराम करण्याची गरज आहे. मात्र रुग्णालयाच्या बेडवरही ते शांत बसले नाही. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक सणसणीत ट्विट सोडलं आहे. त्याचं ट्विट खाली प्रमाणे…
संजय राऊत ट्विट मध्ये म्हणले ‘लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशीश करने वालों की कभी हार नही होती।’ हम होंगे कामयाब… जरूर होंगे… त्यांनी आजारी असूनही असं सणसणीत ट्विट केल्याने सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.