Home महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस कोरोनमुक्त; ७ दिवसांसाठी होम क्वारंटाईन

देवेंद्र फडणवीस कोरोनमुक्त; ७ दिवसांसाठी होम क्वारंटाईन

0

काही दिवसांपूर्वी कोरोनाग्रस्त झालेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोरोना चाचणी रिपोर्ट आता निगेटिव्ह आला असून ते त्यातून बरे झाले आहेत. सेंट जॉर्ज रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून पुढील ७ दिवस ते होम आयसोलेशनमध्ये राहणार आहेत. डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी ट्विट करून सेंट जॉर्ज रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका तसेच इतर सर्व कर्मचारी वृंदाचे आभार व्यक्त केले.

गेल्या महिन्यात २४ तारखेला देवेंद्र फडणवीसांनी आपली कोरोना चाचणी पॉसिटीव्ह आल्याचे ट्विट करून कळवले होते. त्याआधी बरेच दिवस ते नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी व बिहार निवडणुकीसाठी दौर्यावर होते. बऱ्याच ठिकाणी त्यांनी थेट लोकांमध्ये जाऊन संवाद साधल्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली असू शकते असे मीडिया न्यूजमधून सांगण्यात येत आहे.