Home महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसांनी दिला राजीनामा!

देवेंद्र फडणवीसांनी दिला राजीनामा!

0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पदाचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ उद्या म्हणजेच ९ नोव्हेंबर रोजी संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला.  फडणवीस यांच्या राजीनाम्यानंतर आता राज्यपाल काय भूमिका घेतात? की राष्ट्रपती राजवट लागू करणार हे आता लवकरच सुनिश्चित होईल.

मीडिया रिपोर्ट नुसार फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनाम्याचे स्पष्टीकरण दिले. आता पुढे काय होणार याकडे जनतेचे लक्ष तर आहेच पण राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे.