Home महाराष्ट्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी माझा देखील विरोध आहे; त्याऐवजी….

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी माझा देखील विरोध आहे; त्याऐवजी….

0

पुण्यात एका पत्रकार परिषदे दरम्यान बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणले “इंदू मिलमध्ये उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयावरुन वाद चालू आहेत. माझा देखील हा पुतळा उभारण्यासाठी विरोध आहे” पुढे पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले ” इथे पुतळा उभारण्याऐवजी बौध्दीक विचार केंद्र उभारण्यात यावं” अस मत त्यांनी व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे.

लोकसत्ताच्या एक रिपोर्ट नुसार, प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “स्वतः अटल बिहारी वाजपेयी यांनी इंदू मिलमधील ही जागा जागा इंटरनॅशनल स्कुल ऑफ स्टडीज उभारण्यासाठी दिली होती. किंबहुना राजकारण्यांनी राजकारण करून ही जागा पुतळ्यासाठी वापरली व म्हणूनच न्यायालयाला मी विनंती करतोय की, त्यांनी ही पुतळयाची जागा व निधी वाडिया रुग्णालयासाठी वर्ग करण्याचे आदेश द्यावेत” त्याच बरोबर त्यांनी केंद्र सरकारच्या एनआरसी, एनपीए आणि सीएए कायद्याविरोधात २४ तारखेला महाराष्ट्र बंदची हाक प्रकाश आंबेडकर यांनी दिली, ज्यात ३५ संघटना सहभागी होतील असे त्यांनी सांगितले. पुढे “देशात लोकशाहीचा अंश दिसत नसून हिटलरशाही दिसते” अस म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.