परतीच्या पावसात राज्यातील शेतकऱ्यांचे व अनेक पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे काही दिवसांपासून कांद्याचे भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. मीडिया न्यूजनुसार आता कांद्याचे भाव १०० रुपये प्रति किलो पर्यंत पोचले असून हे भाव अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या वाढत असलेल्या भावांमुळे सर्वसामान्य लोक तक्रार करत आहेत. यावर मंत्री बच्चू कडू यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, “शेतकऱ्याचा कांदा परवडत नसेल तर मुळा व लसूण खा.”
केंद्र सरकारने इरानमधून कांदा आयात केल्यामुळे कांद्याचे भारतातील भाव वाढले आहेत असे बच्चू कडू यांनी सांगितले. दरम्यान, सोमवारी १९ ऑक्टोबरला मुंबई बाजार समितीत ७०५ टन कांद्याची आयात झाल्याने होलसेल मार्केटमध्ये कांद्याचे भाव ४० ते ७० रुपये करण्यात आले. तसेच आता आठवडी बाजारांमध्ये मध्यम दर्जाचा कांदा ६० रुपये व चांगल्या दर्जाचा कांदा ८० रुपये प्रतिकिलो या भावाने विकण्यात येत आहे.