Home महाराष्ट्र शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती, दहावी बारावी ऑक्टोबर फेरपरिक्षा होणार दिवाळीनंतर!

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती, दहावी बारावी ऑक्टोबर फेरपरिक्षा होणार दिवाळीनंतर!

0

दहावी, बारावी परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा निकालानंतर काही दिवसात आयोजित करण्यात येते.यंदा राज्यावर करोनाचं संकट असल्याने दहावी आणि बारावी च्या फेरपरीक्षा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

परंतु, आज प्रसार माध्यमांशी बोलताना शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ऑक्टोबर फेरपरीक्षा दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ऑक्टोबर फेरपरीक्षा दिवाळीनंतरच होण्याची शक्यता असल्याचे सांगितले.

दहावीमध्ये एक लाख 25 हजार विद्यार्थी तर बारावीमध्ये एक लाख 80 हजार विद्यार्थी नापास झाले आहेत. या विद्यार्थांची फेरपरिक्षा आता दिवाळी नंतर घेण्याचा निर्णय झाला आहे.