Home महाराष्ट्र बुलढाणा जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या सभेपुर्वी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

बुलढाणा जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या सभेपुर्वी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

0

विधानसभा निवडणूक अवघ्या एका आठवड्यावर आल्याने सर्व राजकीय पक्षांच्या प्रचारसभा सुरू आहेत. भाजपच्या प्रचारसभांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यभर दौऱ्यावर आहेत. आज विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात ते प्रचारसभेसाठी गेले असता तेथून जवळच असलेल्या शेगाव तालुक्यात एका गावात एका शेतकरी युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, नांदुरा, वरवट बकाल येथे आज मुख्यमंत्र्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री जळगाव जामोद तालुक्यातील वरवट बकाल येथे पोहचले असता तेथून जवळच असलेल्या शेगाव तालुक्यातील खातखेड गावातील राजू तलवारे या शेतकऱ्याने “पुन्हा आणूया आपले सरकार’ असे लिहिलेले व कमळाचे चिन्ह असलेले टी-शर्ट घालून गळफास लावून घेतल्याची घटना समोर आली. राजू तलवारे या ३५ वर्षीय युवकाने कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या केल्याची शक्यता आहे असे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समजले. तरी या घटनेबाबत प्रशासनाने अजून कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.