Home तंत्रज्ञान शेतकरी पुत्राने बनवलं कमालीचं सेन्सर: पंचकृषीत होतंय कौतुक

शेतकरी पुत्राने बनवलं कमालीचं सेन्सर: पंचकृषीत होतंय कौतुक

0

राज्यात कायम पाण्याची अडचण असते. कित्येकदा पाऊस कमी पडतो तर कधी जरा जास्तच पडतो. अर्थात कोरडा किंवा ओला दुष्काळ ठरलेलाच असतो. एक वेळ ओला दुष्काळ असेल तर शेतकरी निभावून घेतो पण कोरडा दुष्काळ म्हणजे जनावरांची व शेतीमालाची तारांबळच असते आणि यात अडकतो तो बिचारा शेतकरी. यावर पर्याय उपाय म्हणून पुण्यातील चक्रधर बोरकुटे यांनी एक सेन्सर तयार केलं आहे; ज्यामुळे शेतीच्या कुठल्या भागात किती पाणी द्यावं याची माहिती शेतकऱ्यांना मिळते. परिणामी पाण्याचीही बचत होते व भरभरून पीक मिळतं. या स्टार्टअप साठी चक्रधर यांना लुपिन फांऊडेशन ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्टार्टअप विभागाने मदत केली अशी माहिती चक्रधर यांनी दिली.

मीडिया रिपोर्ट नुसार चक्रधर बोरकुटे यांनी बनवलेल्या सेन्सरवर रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातून नियंत्रण ठेवता येते. एका एकरात हे दोन सेन्सर लावावे लागतात. परिणामी संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना स्मार्टफोनवर पाहायला मिळते. जुन्नर तालुक्यातील बुचकेवाडीतील शेतकरी सुरेश गायकवाड यांच्या शेतात हा सेन्सरचा प्रयोग यशस्वी झाला असून या सेन्सरने पिकांना पाणी कधी द्यावे, किती द्यावे त्याच बरोबर मातीमधील ओलावा किती आहे अशी सर्व माहिती अगदी योग्य दिली. तंत्रज्ञान शेतीसाठी भविष्यात अतिशय फायदेशीर ठरणार असून हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.