Home महाराष्ट्र अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मिळणार 2 संधी!

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मिळणार 2 संधी!

0

अंतिम वर्षातील बॅकलॉग विद्यार्थ्यांची परीक्षा 5 ऑक्‍टोबरपासून तर नियमित विद्यार्थ्यांची 10 ऑक्‍टोबरपासून सुरु होणार आहे. त्याआधी राज्यातील 13 विद्यापीठांअंतर्गत 11 लाख 43 हजार विद्यार्थ्यांकडून परीक्षा कशी देणार, यासंबंधी माहिती मागविण्यात आली आहे.

15 टक्‍के विद्यार्थ्यांशी संपर्कच झालेला नसून तसेच बऱ्याच विद्यार्थ्यांच्या घरातले लोक कोरोनाच्या बाळी गेले असल्याने ,पाच टक्‍के विद्यार्थी कोरोनाबाधित तथा त्यांच्या घरातील कोणीतरी पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी दोन संधी दिल्या जाणार आहेत.

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यातील 10 विद्यापीठांचे दौरे केले. त्यामध्ये त्यांना कळलं की विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील कोणीतरी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना डिसेंबर 2020 पर्यंत परीक्षा देण्याची दोन संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.