प्राईम नेटवर्क : अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असल्याची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसां पासून राष्ट्रवादीच्या दिग्ग्ज नेत्यांकडून अजित पवार यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु होते. सरतेशेवटी त्यांनी आज राजीनामा दिल्याची बातमी समोर आली आहे.
सकाळी सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे हे अजित पवार यांना भेटण्यासाठी आले होते, आणि त्यांनी सुद्धा अजित पवार यांच्या मनधरणीचे प्रयत्न केले होते. यावेळी भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीला अजित पवार उपस्थित असल्याची बातमी सुद्धा समोर येत आहे.
दरम्यान शनिवारी राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी देणारी घटना घडली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. राजभवनात हा शपथविधी पार पडला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली होती.