Home महाराष्ट्र आधी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा व नंतर देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाचा दिला...

आधी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा व नंतर देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाचा दिला राजीनामा !

0

राज्याच्या राजकारनाचं नाट्यमय स्वरूप आता हळूहळू बाजूला सरून सत्य जनतेसमोर येत आहे. आज न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार भाजपला उद्या पाच वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचा वेळ देण्यात आला होता. अर्थात आपल्याकडे बहुमत नाही हे लक्षात येताच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. अजित पवारांनी राजीनामा दिल्याबरोबर साहजिकच भाजपला बहुमत सिद्ध करणे शक्य नव्हते. म्हणून शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. महत्वाचं म्हणजे फडणवीस यांनी बहुमत नसल्याने राजिनामा देत असल्याचा खुलासा देखील केला.

फडणवीस यांनी राजीनामा देण्याचं कारण अजित पवार यांचा राजिनामा असल्याचं स्पष्ट केलं. ते म्हणाले, ‘कोर्टाच्या आदेशानंतर अजित पवार आणि मी चर्चा केली. त्यांनी सांगितलं की, काही कारणाने आम्ही आघाडीत राहू शकत नाही. त्यामुळे आमच्याकडे बहुमत शिल्लक नाही म्हणून मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत आहे.” असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांचं नांव न घेता त्यांच्यावर टीका केली. त्याच बरोबर त्यांनी ‘जे सत्ता स्थापन करणार आहेत त्यांना शुभेच्छा’ असंही म्हटलं आहे. आता महाशिवाघाडी बहुमत सिद्ध करेल का? राज्यपाल महाशिवाघाडीला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण देतील का? याकडे सर्व राज्याचे लक्ष आहे.