Home महाराष्ट्र माफ करा साहेब यावेळी पहिल्यांदा आम्ही तुमचं ऐकणार नाही: आव्हाडांचं ट्विट

माफ करा साहेब यावेळी पहिल्यांदा आम्ही तुमचं ऐकणार नाही: आव्हाडांचं ट्विट

0

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात ईडीने गुन्हा दाखल केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: उद्या ईडीच्या कार्यालयात जाणार होते. त्याच बरोबर शरद पवारांनी ट्विटद्वारे कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले व त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत पवारांचा हा आदेश मान्य नसल्याचं म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाडांचं सविस्तर ट्विट खालील प्रमाणे:
‘माफ करा साहेब, यावेळी पहिल्यांदा आम्ही तुमचं नाही ऐकणार. तुमच्या महाराष्ट्र घडवतानाच्या वेदना आम्ही बघितल्या आहेत. कर्करोग, मांडीच्या हाडाचे ऑपरेशन, पायाला इजा, एवढं सगळं होऊनही तुम्ही लढताय. वय वर्ष ७९ असतांनाही हे सगळे तुम्ही आमच्यासाठी सोसलंय, उद्यासाठी माफ करा.

दुसरीकडे पवार जरी स्वतः ईडीच्या कार्यालयात जाणार असले तरी मीडिया न्यूज नुसार पवारांना ईडीच्या कार्यालयात अद्याप बोलावलं नसल्यामुळे सध्यातरी नो इन्ट्री राहील; सोबतच आजूबाजूच्या परिसरात जमावबंदी करण्यात आली असून आता पवारांना ईडीच्या कार्यालयात प्रवेश मिळेल का हे वेळच सांगेल…