Home महाराष्ट्र माजी मुख्यमंत्र्यांना हाय कोर्टाचा आणखी एक दणका!

माजी मुख्यमंत्र्यांना हाय कोर्टाचा आणखी एक दणका!

0


राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हाय कोर्टाने अजून एक दणका दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंड पीठाने फडणवीसांना पदाचा गैरवापर करून सरकारी कर्मचाऱ्यांची खाती अक्सिस बँकेत वळविण्याबाबत नोटीस बजावली आहे. या नोटीस मध्ये देवेंद्र फडणवीस यांना ८ आठवड्यात उत्तर देण्यास बजावले आहे.


देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असतांना त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांची खाती इतर बँकामधून अक्सिस बँकेत वळविली होती तर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस ह्या अक्सिस बँकेत मोठ्या पदावर कार्यरत असल्याने हा निर्णय घेण्यात आला होता असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. मोहनिश जबलपुरे यांनी ह्यांनी फडणवीस यांच्यावर पदाचा गैरवापर केल्या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली होती त्या नुसार आता उच्च न्यायालयाने ही नोटीस त्यांना बजावली आहे.