काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील यांचे सोमवारी मध्यरात्री २ वाजून १० मिनिटांनी त्याच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी चार वाजता अर्थात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते १०० वर्षांचे असून एक कर्तबगार व्यक्तिमत्व होते. २० वर्षे ते आमदार होते. या दरम्यान ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण, मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण व बॅरिस्टर ए. आर. अंतुले या पाच मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात सहकार, नियोजन, महसूल, कायदा व न्याय, अन्न व नागरी पुरवठा, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे आदी खात्यांचा कारभार त्यांनी पाहिला आहे. वयाच्या ६१ व्या वर्षी १९८० मध्ये त्यांनी आपली शेवटची निवडणूक लढवली आणि त्यांनी ती जिंकली देखील. पुढे १९८५ पासून त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली. त्यांच्या साहित्यातही चांगलाच हात होता. त्यांची पाच पुस्तके आहेत ज्यापैकी माझे शिक्षण हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं होतं.
संगमनेरचे माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील स्वातंत्र्यलढ्यात गांधीजींच्या खांद्याला खांदा देऊन ‘चले जाव’ चळवळीत सहभाग घेतला होता. चार विधानसभा निवडणुका त्यांनी संगमनेर मतदारसंघातून जिंकल्या.