Home महाराष्ट्र राज्यपाल कोश्यारी यांनी एका मॉडेलला विशेष हेलिकॉप्टरने उत्तराखंडला पाठवल्याची बातमी व्हायरल, वाचा...

राज्यपाल कोश्यारी यांनी एका मॉडेलला विशेष हेलिकॉप्टरने उत्तराखंडला पाठवल्याची बातमी व्हायरल, वाचा काय आहे सत्य

0

देशभरात लॉकडाउन अतिशय गंभीररित्या सूरु आहे, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात विनापरवानगीने जाणे सुद्धा कायद्याचे उल्लंघन आहे असे असताना मात्र, ” महाराष्ट्रातील राज्यपालांनी एका उत्तराखंड मधील मॉडेल ला स्पेशल हेलिकॉप्टर देऊन तिच्या गावी पोचवले आणि तिला घरापर्यंत पोहचवण्यासाठी विशेष सैन्याची गाडी सुद्धा देण्यात आली” असा गंभीर स्वरूपाचा आरोप होत आहे.

उत्तराखंड मधील प्रसिद्ध दैनिक “पर्वतजन” याने यासंबंधी बातमी काल प्रसिद्ध केली होती, त्यांच्या माहितीनुसार, “जेनी उर्फ जयंती नामक एक मॉडेल मुंबई मध्ये कोरोनामुळे अडकली होती, तिला तिच्या घरापर्यंत पोहचवण्यासाठी कोशियारी यांनी स्वतः हेलिकॉप्टरची सोय करून दिली, त्यानंतर सैन्यदलाच्या गाडीने तिला इच्छित स्थळी पोचवण्यात आले. एवढी स्पेशल ट्रीटमेंट मिळण्यासाठी ही मॉडेल राज्यपालांची आहे तरी कोण असा प्रश्न पडतो”

कथित जैनी नामक मॉडेल ही उत्तराखंड मध्ये राहणारी असून कोशियारी हे सुद्धा उत्तराखंड येथील आहेत. जैनी ही एका नवोदय विद्यालयात शिकवणाऱ्या शिक्षकाची मुलगी आहे. मात्र या दैनिकाच्या म्हणण्यानुसार ही जैनी एवढ्या स्पेशल ट्रीटमेंट देऊन सुद्धा सुरक्षित अंतर पाळत नसून तिचे कुटुंब सर्व नियमांना हरताळ फासत आहेत.

सदर बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर उत्तराखंड मधील भाजप कार्यकर्त्यांनी हे आरोप चुकीचे असल्याचे जाहीर केले तसेच ही मॉडेल प्रसिद्धी साठी कोशियारी यांची प्रतिमा मालिन करत आहे असे सांगण्यात येत आहे. “पर्वतजन” या दैनिकाने ही बातमी प्रसिद्ध केल्यानंतर आज ती बातमी त्यांच्या संकेतस्थळावरून काढून टाकण्यात आली आहे. एकंदर या घटनेची सत्यता स्पष्ट होण्यासाठी कोशियारी यांचे वक्तव्य महत्वाचे ठरणार आहे.