Home महाराष्ट्र सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडून शिवसेनेला आमंत्रण: आज संध्याकाळ पर्यंतची आहे वेळ!

सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडून शिवसेनेला आमंत्रण: आज संध्याकाळ पर्यंतची आहे वेळ!

0

सत्ता स्थापन करण्यास भाजपानं असमर्थता दर्शविल्यानंतर आता ही संधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला दिली आहे. कारण भाजपनंतर दुसरा मोठा पक्ष शिवसेना असल्याने राज्यपालांनी सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेला आमंत्रण दिलं आहे. आज अर्थात ११ नोव्हेंबर रोजी संध्याकाळपर्यंत शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासंदर्भात भूमिका मांडण्यासाठी वेळ देण्यात आला आहे अशी माहिती मिळत आहे.


मीडिया रिपोर्टनुसार सत्ता स्थापनेसंदर्भात भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कोअर कमिटीच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेेेट घेऊन भाजपा सरकार स्थापन करणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे आता राज्यपालांनी सत्तास्थापनेचं आमंत्रण शिवसेनेला दिलं आहे. अर्थात शिवसेनेकडं बहुमतासाठी पुरेसा आकडा नसल्याने शिवसेनेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मदत घेणं गरजेचं आहे. आज संध्याकाळपर्यंत शिवसेना काही करेल का आणि आज तरी सत्ता स्थापनेचा तिढा सुटेल का यावर राज्याचे लक्ष लागून आहे.