पुणे तळेगाव एमआयडीसीला जोडणारा इंद्रायणी नदीवरील पुलावर सर्रास नियमांचं उल्लंघन होत आहे. हा पूल जड वाहनांसाठी नसूनही इथून भरमसाठ जड वाहनं जातात. परिणामी आज दिनांक १६ डिसेंबर रोजी अर्थात सोमवारी हा पूल कोसळला. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसून काही कामगारांचे नशीब बळवंत म्हणून ते थोडक्यात वाचले. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात हा पूल असून गेल्या दोन वर्षांपासून या पुलावरून जड वाहनांना जाण्यास बंदी आहे.
लोकमतच्या एका रिपोर्ट नुसार, ‘पुलावर मोठ्या वाहनांनी ये-जा करू नये म्हणून प्रशासनाने काही अडथळे बसवले होते. मात्र ये-जा करणाऱ्या नागरिकांनी JCB च्या साहाय्याने ते तोडून पुन्हा मोठ्या-मोठ्या वाहनांसाठी पुलाचा वापर चालू केला. परिणामी आज सकाळी हा पूल कोसळला. जोरदार आवाजाने गावकरी धावत पुलाच्या दिशेने आले व पाहून लोक भयभीत झाले. तत्काळ घटनास्थळी एमआयडीसी पोलीस आले. घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही याचा तपास करून खात्री केली. पूल कोसळण्याच्या नुकताच आधी पुलावरून एमआयडीसीत काम करणाऱ्या कामगारांची बस गेली होती अशी माहिती मिळाली असून त्याचं नशीबच बळवंत म्हणावं लागेल ज्यामुळे इतका मोठा अनर्थ टळला.