कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या ७ महिन्यांपासून राज्यातील शाळा कॉलेजेस बंद आहेत. बऱ्याच शाळा ऑनलाईन माध्यमांतून विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. मात्र सगळ्यांसाठी ऑनलाईन माध्यमे उपलब्ध नसल्याने काही विद्यार्थ्यांना तसेच शाळांनाही अडचणी येत आहेत. त्यामुळे शैक्षणिक वर्ष व अभ्यासक्रम लांबणीवर पडत चालला आज. या बाबींचा विचार करून राज्य शासनाने नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी टेलिव्हिजनवरून शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सह्याद्री वाहिनीवर ‘ज्ञानगंगा’ नावाचा कार्यक्रम सुरु करण्यात येत आहे.
मीडिया न्यूजनुसार महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून येत्या सोमवारपासून अर्थात २६ ऑक्टोबरपासून ‘ज्ञानगंगा’ कार्यक्रम सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. प्रत्येक सोमवारी सकाळी ७. ३० पासून दुपारी १२. पर्यंत हा कार्यक्रम चालेल. या कार्यक्रमामुळे नववी ते बारावीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ घेता येणार आहे. ‘ज्ञानगंगा’ कार्यक्रमाची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड़ यांनी ट्विटरारून दिली. तसेच इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एमकेसीएल आणि राज्य परिषदेकडून ‘टिलीमिली’ नावाचा कार्यक्रम काही दिवसांपूर्वी सुरु करण्यात आला होता.