हवामान विभागाकडून मंगळवारी आणि बुधवारी पुणेसह ७ जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी केला आहे. कुलाबा वेधशाळेने मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तर अरबी समुद्रात चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने पावसासाठी हे अनुकूल वातावरण असून पावसाचा जोर वाढत आहे. त्यामुळे कोकणात 4 ते 7 ऑगस्ट, मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात 4 ते 6 ऑगस्ट, तर विदर्भात 4 व 5 रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
गेले काही दिवस पावसाची हजेरी नसली तरी मंगळवार पासून पावसाची शक्यता सांगितली आहे.