Home अर्थजगत कोरोनामुळे कोंबड्यांचे भाव घसरले…

कोरोनामुळे कोंबड्यांचे भाव घसरले…

0

जिवंत कोंबडीचा भाव झाला आहे फक्त १० रुपये! अमरावती मध्ये जिवंत कोंबडीचा हा भाव ऐकून अनेक जण थक्क झाले तर पोल्ट्री उद्योगाचे मात्र तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे खरंच या जुन्या उक्तीनुसार कोंबडी पेक्षा मसाला महाग झाल्याचे चित्र बाजारात पाहायला मिळत आहे.

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान माजवले असून आतापर्यंत या व्हायरसने अनेकांचा बळी सुद्धा घेतला आहे. कोरोनाने भारतात सुद्धा एंट्री केली आहे नुकतेच याचे २ रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत. म्हणूनच खबरदारी म्हणून शासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. परंतु व्हॉटसअप आणि सोशल मीडिया मुळे चिकन खाल्याने कोरोना होतो अशी अफवा पसरवली जात असल्यामुळे अनेक पोल्ट्री फार्म व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

पोल्ट्री फार्म व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार कोरोना बाहेर देशात असताना लोक चिकन चवीने खात होते त्यावेळी जिवंत कोंबडीला १५० रुपये पर्यंत भाव होता मात्र जेव्हापासून दिल्लीमध्ये कोरोनाचा संशयीत आढळला तेव्हापासून लोकांनी चिकन खाणे बंद केले आहे. त्यामुळे चिकनचे भाव ढासळले आहेत. सध्या व्यापारी आठ ते दहा रुपये किलोने कोंबडी घेत असून त्यामुळे त्यांना लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.