Home महाराष्ट्र मुंबईतील ही ३ जैन मंदिरे उघडण्यास सर्वोच्च न्यायालयाने दिली परवानगी!

मुंबईतील ही ३ जैन मंदिरे उघडण्यास सर्वोच्च न्यायालयाने दिली परवानगी!

0

महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यभरातील प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. परंतु लवकरच पर्युषण पर्व सुरू होणार असल्याने जैन बांधवांनी जैन मंदिरे उघडी करण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करून सर्वोच्च न्यायालयाने पर्युषण प्रार्थनेसाठी मुंबईतील ३ जैन मंदिरे उघडण्यास परवानगी दिली आहे.

त्यामुळे २२ व २३ ऑगस्टला मुंबईतील दादर, भायखळा व चेंबूर येथील जैन मंदिरे प्रार्थनेसाठी खुली राहणार आहेत. तसेच न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी असेही स्पष्ट केले की अन्य कोणत्याही मंदिरांना तसेच गणेश चतुर्थीच्या कार्यक्रमांना ही परवानगी लागू असणार नाही.