विधानसभेच्या जोरदार रणधुमाळी नंतर निवडणुकांच्या निकालासाठी केवळ १ दिवस शिल्लक राहिला आहे. पण इकडे निकाल लागण्या पूर्वीच आरोप प्रत्यारोप चालू झाले आहेत. आता हेच पहा ना, एक्झिट पोलनुसार भाजप-सेनेचे सरकार पुन्हा येणार अशी शक्यता निर्माण झाल्याने विरोधकांचे धाबे दणाणले गेले आहे. परिणामी “वसई, नालासोपारा, बोईसर या तिन्ही सीट मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असे बोलले जात आहे. त्यामुळे ‘आमचा एकही उमेदवार पडला, तर ईव्हीएम घोटाळा असेल” असा दावा बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर करीत आहेत.
मीडिया न्यूज नुसार हितेंद्र ठाकूर यांचा ‘बविआ’ हा पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासह महाआघाडीमध्ये आहे. असं असताना देखील या निवडणुकीत शिवसेना, भाजप, रिपाई या सर्वांनीच मला मदत केली असल्याचा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. त्यामुळे यंदा निकालानंतर राजकीय वर्तुळात गोंधळ होण्याची चिन्ह दिसत आहेत.