Home आरोग्य “पोलीसांनो फुकट फिरणार्यांना काठीला तेल लावून फटके द्या!” : गृहमंत्री अनिल देशमुख

“पोलीसांनो फुकट फिरणार्यांना काठीला तेल लावून फटके द्या!” : गृहमंत्री अनिल देशमुख

0

लॉकडाऊन मध्ये विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या लोकांना पोलिस लाठीने चोप देत आहेत. प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊन सुद्धा काही लोकं घराबाहेर पडत आहे. त्यामुळे अशा उद्व्यापी लोकांसाठी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना खास आदेश दिले आहेत.
“राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, देशाचे पंतप्रधान सतत घराबाहेर पडू नका, संपर्क टाळा असा सल्ला देत आहेत. तरीही समाजातील काही ५ ते १० टक्के लोकं घराच्या बाहेर पडून मनसोक्त फिरत आहेत. अशा लोकांसाठी पोलिसांनी हातात लाठी घेऊन तयार रहावं. लाठीला तेल लावून अशा लोकांवर कारवाई केल्याशिवाय आता पर्यायच उरलेला नाही”, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, परिस्थितीचा अंदाज घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री आठ वाजता जनतेशी संवाद साधत पुढील २१ दिवस संपूर्ण देशात लॉक डाऊन करणार असल्याचं सांगितलं.

“संपूर्ण राज्यात अन्न-धान्याचा पुरेल असा साठा आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री यांनी सर्व रेशन दुकानांना सध्याच्या घडीला योग्य प्रमाणात धान्य मिळेल याची सोय सुद्धा केली आहे. त्यामुळे नागरिकांनी अन्नधान्याची चिंता अजिबात करु नये.जिवनावश्यक वस्तू तुम्हाला मिळत राहणार आहे. फक्त किराणा माल, रेशनच्या दुकानावर जात असताना गर्दी करणं आपणहून टाळा.सोशल डिस्टन्स राखणं हे अत्यंत गरजेचं आहे. नागरिकांनी घाबरुन जाण्याचं कारण नाही”, असं स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांशी विशेष संवाद साधताना दिलं.