Home महाराष्ट्र राज्यात लॉज, हॉटेल, रेस्टॉरंट लवकरचं सुरू होणार : उद्धव ठाकरे

राज्यात लॉज, हॉटेल, रेस्टॉरंट लवकरचं सुरू होणार : उद्धव ठाकरे

0

अनलॉक 1 मध्ये राज्यातील उद्योग-व्यवसाय सुरु करण्यात आले आहे. यानंतर आता हॉटेल आणि रेस्टॉरंटसुद्धा लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायामध्ये हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान आहे. हे लक्षात घेऊन हा करोनाच्या पार्श्‍वभूमीवर एक कार्यपद्धती तयार केली असून ती लवकरच अंतिम झाल्यावर परवानगी देण्यात येईल, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

“हॉटेल तसेच लॉज सुरू करण्यापूर्वी खूप काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल. येणारा प्रत्येकजण निरोगी असेल यासाठी तपासणी करावी लागेल. एक पॉझिटिव्ह व्यक्ती हॉटेलमध्ये आला तरी सर्व हॉटेल व कर्मचारी आजारी पडू शकतात. त्यासाठीच आखून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे नियमांचे पालन करावे लागेल”, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

“राज्यातील हॉटेल उद्योगाला आता खेळते भांडवल मिळणे अत्यंत आवश्यक आहे. पर्यटन व्यवसायात इतर राज्यांशी आपली मोठी स्पर्धा कायम असते. आता काही प्रमाणात हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरक्षित अंतर ठेवून सुरू करायला परवानगी द्यावी, त्यामुळे पर्यटक जास्तीत जास्त काळ महाराष्ट्रात, मुंबईत राहतील. सध्या हॉटेलांना औद्योगिक दरात वीज आणि पाणी द्यावे”, अशी मागणी हॉटेल मालकांनी करायला सुरुवात केली आहे.