Home महाराष्ट्र विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेतले नाही तर राज्यपाल हटाओ मोहीम सुरू करणार :...

विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेतले नाही तर राज्यपाल हटाओ मोहीम सुरू करणार : भारतीय छात्र संघटना

0

राज्यात पदवीच्या अंतिम वर्षाच्या परिक्षेवरून मोठे राजकारण सुरू आहे अशातच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वटहुकूम जारी करून अपवादात्मक वर्षं म्हणून सर्वच राज्यातील अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांना तसेच एटीकेटी, बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांनादेखील सरसकट उत्तीर्ण करून पुढील वर्गात प्रवेश द्यावा तसेच विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार न करणाऱ्या राज्यपालांची पदावरून हक्कलपट्टी करावी, अशी मागणी विद्यार्थी भारती छात्र संघटनेच्या राज्य अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी केली आहे.

दहा लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना कोरोना झालाच तर त्याची जबाबदारी, परीक्षा घेण्याचा अट्टाहास असलेले राज्यपाल स्वतः घेतील का?असा सवाल विद्यार्थी भारतीचे राज्य कार्याध्यक्ष प्रणय घरत यांनी उपस्थित केला.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला होता, विद्यापीठांच्या अंतिम वर्ष, अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाची ‘मनमानी’ आणि ‘अभूतपूर्व’ अशी अवहेलना करत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील तरतुदींनुसारच विद्यापीठ परीक्षांबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी घेतल्यामुळे राज्य सरकार- राज्यपाल पुन्हा संघर्षाची ठिणगी पडली आहे. महाराष्ट्रात साथरोग नियंत्रण कायदा लागू असल्यामुळे राज्यपालांनी घेतलेली ही भूमिका कितपत तर्कसंगत आणि कायदेशीर आहे की त्यामागे केवळ राजकारण आहे हे समजणे अपरिहार्य आहे.