Home महाराष्ट्र “झेपत नसेल तर मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडा” : निलेश राणे

“झेपत नसेल तर मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडा” : निलेश राणे

0

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तीन दिवसांसाठी महाबळेश्वरला सुट्टीवर गेले आहेत. यावरून भाजपा नेते निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीकेची तोफ डागली आहे. निलेश राणे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ते आपल्या पोस्ट मध्ये म्हणाले, “१९९५ पासून मी सहा मुख्यमंत्री पाहिले. उद्धव ठाकरेंच्या आधी एकाही मुख्यमंत्र्यांनी सुट्टी घेतल्याचं आठवत नाही.” पुढे राणे म्हणाले, “उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होऊन फक्त तीन महिनेच झाले व लगेचच तीन दिवस सुट्टीवर जाण्याचं कारण काय? त्यांनी कोणता पराक्रम केला ?” असा सवाल निलेश राणे यांनी केला.

निलेश राणे याचं ट्विट पहा पुढील प्रमाणे…

निलेश राणे आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हणाले, “झेपत नसेल तर मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडा.” लोकसत्ताच्या एका रिपोर्ट नुसार याआधी देखील २८ जानेवारीला निलेश राणे यांनी शिवभोजन योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप केला होता व “शिवसेना चाटूगिरी करुनच सत्तेत आली” असे वक्तव्य केले होते.

निलेश राणे याचं सविस्तर ट्विट पुढील प्रमाणे…

“मी १९९५ पासून ते २०१९ पर्यंत ६ मुख्यमंत्री बघितले पण त्या पदावर असताना त्यांनी सुट्टी घेतलेली आठवत नाही. जवळपास ३ महिने झाले आणि उद्धव ठाकरे ३ दिवस सुट्टीवर. काय मोठा पराक्रम केला या तीन महिन्यांत की यांना सुट्टी घ्यावी लागली. झेपत नसेल तर खुर्ची खाली करा.”