Home महाराष्ट्र “मी उद्या बेळगावला जात आहे. पाहू काय घडतंय” – संजय राऊत

“मी उद्या बेळगावला जात आहे. पाहू काय घडतंय” – संजय राऊत

0

१७ जानेवारी १९५६ मध्ये सीमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी राजेंद्र पाटील बेळगावला गेले होते. बेळगाव मधील हुतात्मा चौकात महाराष्ट्र एकीकरण समिती व शिवसेना तर्फे हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन आणि अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख मार्गावरून फेरी काढली होती. याच दरम्यान आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-येड्रावकर यांना बंदोबस्त केलेल्या बेळगाव पोलिसांनी शुक्रवारी सकाळी ताब्यात घेतले.

ताब्यात घेतल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी राजेंद्र पाटील यांना सीमेबाहेर सोडले. या घटनेचा महाराष्ट्र एकीकरण समितीने निषेध केला असून संजय राऊत यांनी देखील निषेध व्यक्त करत काल अर्थात शुक्रवारी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक ट्विट केलं आहे. ते म्हणतात, “मी उद्या बेळगावात येत आहे, बघू!” परिणामी आज (शनिवारी) बेळगावमध्ये पुन्हा वातावरण तापण्याची चिन्हे आहे. राऊत यांचे सविस्तर ट्विट खालील प्रमाणे

आता आज बेळगावात काय होणार हे वेळच सांगेल.