Home महाराष्ट्र रेड झोन सोडून बाकी जिल्ह्यांंत कोरोनामुळे झालेला एसटीचा चक्काजाम संपुष्टात!

रेड झोन सोडून बाकी जिल्ह्यांंत कोरोनामुळे झालेला एसटीचा चक्काजाम संपुष्टात!

0

माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी काल लालपरी पुन्हा सुरू करण्यासंबंधी घोषणा केली. राज्य सरकारने जारी केलेल्या नियमावली नुसार दिलेल्या सूचनांचे पालन होऊनच अटी आणि शर्थी नुसार एसटी बस सुरु होतील असे ते म्हणाले.

अनिल परब म्हणाले, ” गेल्या २३ मार्च रोजी लॉकडाऊन लागू झाल्यापासून मुंबई आणि उपनगरात अत्यावश्यक सेवा वगळता अख्ख्या महाराष्ट्रात एसटी ची सेवा बंद आहे. पण लॉकडाऊन च्या चौथ्या टप्प्यात राज्य सरकारने रेड झोन वगळता इतर जिल्ह्यात एसटीची वाहतूक पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. ही एसटीची सेवा मात्र जिल्ह्याच्या सीमेपर्यंत असणार असून शुक्रवार पासून हे सुरू होईल”

खालील नियमांचे पालन हे आवश्यक असणार आहे.

1. जिल्हा अंतर्गत सेवा सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंतच ही बस सेवा सुरू राहणार आहे.

2. प्रवासासाठी द्यावयाच्या सर्व बसेस योग्य सॅनिटायझरचा वापर करुन निर्जंतुक केलेल्या असायला हव्यात.

3. सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून बसच्या एकूण क्षमतेच्या केवळ ५० टक्के प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा असेल.

( साधारण एका बस मध्ये २० ते २२ प्रवाशी , एका सीट वर एकच प्रवासी )

4. ज्येष्ठ नागरिक व 10 वर्षाखालील लहान मुलांना बस प्रवासाची परवानगी असणार नाही. (अत्यावश्यक वैद्यकीय कारण वगळून )

5. प्रत्येक प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने प्रवास सुरु करताना सॅनिटायझरने आपले हात निर्जंतुक करणे गरजेचे आहे.

6. प्रवासामध्ये प्रत्येक प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे.