Home महाराष्ट्र “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करतांना कम्फर्टेबल वाटतं” जितेंद्र आव्हाड यांची जाहीर...

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करतांना कम्फर्टेबल वाटतं” जितेंद्र आव्हाड यांची जाहीर कबुली

0

ठाणे महापालिकेच्या काही प्रकल्पांचे लोकार्पण व ई-भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर तोफ डागली तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. आव्हाड म्हणाले, “पूर्वी एकनाथ शिंदे व माझी मैत्री पडद्याआड होती. मात्र, आज महाविकासआघाडी मुळे आम्ही उघडपणे आमची मंत्री ठेवू शकतो. विरोधी पक्षात होतो तेव्हाही कधी आम्ही एकमेकांवर कंबरेखालचे वार केले नाही. मात्र, राजकारणात काही लोक तोंडावर गोड बोलतात, कौतुक करतात, आपले मित्र असल्याचे भासवतात व प्रत्यक्षात कंबरेखाली वार करून मोकळे होतात आणि याच लोकांमुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे” असं बोलत आव्हाड यांनी भाजपवर निशाणा साधला असे लोकमतच्या रिपोर्टनुसार समजले.

पुढे बोलतांना आव्हाड म्हणाले, “मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत काम करताना कम्फर्टेबल वाटतं. आतापर्यंतच्या कुठल्याच मुख्यमंत्र्यांसोबत काम करतांना इतकं कम्फर्टेबल वाटलं नाही” अशी जाहीर कबुली दिली. पुढे त्यांनी महाविकास आघाडीने केलेली कामे व भविष्यात होणाऱ्या विकासाचा आढावा देत मुंब्र्यात काही योजना राबवण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली.