Home महाराष्ट्र कोल्हापूर पोटच्या गोळ्यासाठी माकडिणीने मृत्यूला कवटाळले, वाचून भावुक व्हाल

पोटच्या गोळ्यासाठी माकडिणीने मृत्यूला कवटाळले, वाचून भावुक व्हाल

0

प्राईम नेटवर्क : मंडळी पुराच्या पाण्याचा आणि माकडीणीचा किस्सा आठवतो का ? ज्यात माकडीण पुराच्या पाण्यातून जाताना आपल्या पिल्लाचा जीव वाचवायचा प्रयत्न करत असते, पण जेव्हा पुराचं पाणी वाढून तिच्या नका-तोंडात जायला लागतं, तेव्हा मात्र ती पिलाला आपल्या पायाखाली घ्यायलाही मागे-पुढे पाहत नाही. आणि स्वतःचा जीव वाचवते. ही सत्यकथा आहे की दंतकथा ठाऊक नाही,पण आज या कथेला अपवाद ठरणारी घटना राधानगरी येथील कौलव येथे घडलेय.

गेल्या काही वर्षात ग्रामीण भागात वानरांचे कळप अन्नाच्या शोधार्थ लोकवस्ती कडे धाव घेत आहेत. संध्याकाळची सहाची वेळ, नयनरम्य वातावरण अशा या वातावरणात त्या दोघांचा खेळ रंगला होता,मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं, अचानक माकडाच्या पिलाने विद्द्युत वाहिनीवर उडी घेतली,मात्र ही वाहिनी प्रवाहित असल्याने पिलू तडफडू लागले. हे पाहताच पिलाच्या आईने पिल्लूचा जीव वाचवण्यासाठी विजवाहिनीला कवटाळले. विजवाहिनी पासून पिलाला दूर करण्याची मातेची धडपड काही क्षणातच थंडावली आणि दोघेजण जमिनीवर निपचित पडले.

पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी मातेची चालेली धडपड अन् मग दोघांचे मृत्यूला कवटाळणे हे सारे मन हेलावणारे दृष्य पाहून बघ्यांच्या डोळ्यांच्या कडा अक्षरशः पाणावल्या होत्या. हल्ली माणसातील माणुसकी लोप पावून सख्या नात्यावर प्रश्न उठत असताना प्राण्यांतील प्रेमाने सर्वांच्या हृदयाला पाझर मात्र फोडला.