Home महाराष्ट्र कोरोना विषाणूपेक्षा पावरफुल कोशियारी! राज्यात लागू करणार राष्ट्रपती राजवट?

कोरोना विषाणूपेक्षा पावरफुल कोशियारी! राज्यात लागू करणार राष्ट्रपती राजवट?

0

महाराष्ट्रामधील करोनाग्रस्तांची संख्या दिवसोंदिवस सारखी वाढताना दिसत आहे. एकीकडे राज्यासमोर करोनाचे मोठे संकट असतानाच राज्यामध्ये राजकीय वातावरणसुद्धा चांगलेच तापले आहे. राज्यातील वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांनी मागील काही दिवसांमध्ये राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेटगाठ घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कोश्यारी यांची भेट घेऊन राज्यातील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.

दरम्यानच्या काळात शरद पवार यांनी सोमवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मातोश्री बंगल्यावर भेट घेतली. त्यामुळेच राजकीय चर्चांना सोमवार संध्याकाळपासूनच उधाण आलं आहे. महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट लागणार का यासंदर्भात चर्चा सुरु झाल्या आहेत.

नितीन राऊत यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करत पुढील वक्तव्य केले, “शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर कुणालाही भुवया उंचावण्याची गरज नाही. कारण शरद पवार यांचं मत घेतलं सर्वजणांकडून जातं. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील शरद पवारांशी चर्चा करत असतात. अनेक राज्याचे मुख्यमंत्री शरद पवारांशी चर्चा करत असतात. अशात शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली तर त्यात एवढा गदारोळ होण्याचं कारण नाही.

आमच्याकडे १७७ आमदारांचं बहुमत आहे. यामध्ये शरद पवारांचं मोठं श्रेय आहे. कोरोनामुळे राज्य संकटात असतात सर्वांनी एकत्र येऊन या संकटाशी लढणं महत्त्वाचं आहे. इतर राज्यात सर्व विरोधक तसं करताना पाहायला मिळतायत. महाराष्ट्रात तसं व्हावं अशी इच्छा राऊतांनी बोलून दाखवली.शरद पवार हे सर्वांसाठी मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहे हे सांगण्यास संजय राऊत विसरले नाहीत. सरकारची एकही चिरा ढळली जाणार नाही”