Home जागतिक शरद पवारांप्रमाणेच अमेरिकेच्या जो बायडनने सुद्धा केले भर पावसात भाषण!

शरद पवारांप्रमाणेच अमेरिकेच्या जो बायडनने सुद्धा केले भर पावसात भाषण!

0

मागच्या वर्षी विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यातील एका सभेत भर पावसात केलेले भाषण चांगलेच गाजले होते. या भाषणाला प्रचंड गर्दीही होती व पाऊस पडत असूनही लोक जागचे हलले नव्हते. असाच काहीसा प्रकार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवार असलेले जो बायडन यांच्या भाषणाच्या वेळी झाला असल्याचे मीडिया न्यूजवरून समजले.

जो बायडन हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी डेमोक्रेटिक पार्टीकडून निवडणूक लढवत आहेत. येत्या ३ नोव्हेंबरला ही निवडणूक असल्याने सर्व उमेदवार जोरदार प्रचार करीत आहेत. अशीच जो बायडन यांची एक प्रचार सभा काल फ्लोरिडामध्ये होती. त्यावेळी जो बायडनभाषण करत असतांना जोराचा वादळी पाऊस सुरु झाला. मात्र बायडन यांनी भाषण पूर्ण केले. या सभेत गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून सर्वांना आपापल्या कारमधून उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे सर्व लोक कारमध्ये बसून सभा ऐकत होते. या प्रसंगावरून बऱ्याच लोकांनी ट्विट करून जो बायडन यांचे कौतुक केले. तर महाराष्ट्रातील लोकांना गेल्या वर्षीच्या शरद पवारांच्या भाषणाची आठवण झाली.