Home महाराष्ट्र महाविकास आघाडीचे खातेवाटप अखेर जाहीर!

महाविकास आघाडीचे खातेवाटप अखेर जाहीर!

0

नुकत्याच आलेल्या लोकमतच्या वृत्तानुसार महाराष्ट्रातील राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या महाविकास आघाडीच्या सरकारमधील खातेवाटपावरून सुरू असलेला वाद अखेर मिटला आहे. या खातेवाटपाची यादी अधिकृतरित्या जाहीर झाली नसून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या खातेवाटपाची यादी लोकमतच्या हाती लागली आहे.
३० डिसेंबरला पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या एकूण ३६ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र त्यानंतर बरेच दिवस खातेवाटप जाहीर न झाल्याने राज्यभरात चर्चा चालली होती. तसेच खातेवाटपावरून तिन्ही पक्षांमध्ये वाद सुरू असल्याचीही चर्चा होती. अखेर काँग्रेस व राष्ट्रवादीने आपल्या मंत्र्यांची खातेवाटपाची यादी निश्चित केली असून मुख्यमंत्र्यांकडे सोपवली आहे. ही यादी अधिकृतपणे जाहीर झाली नसली तरी लोकमतच्या हाती लागल्याने सर्वांसमोर आली आहे.

या यादीनुसार राष्ट्रवादीचे खातेवाटप पुढीलप्रमाणे:
१. अजित पवार – वित्त व नियोजन (अर्थमंत्री)
२. जयंत पाटील – जलसंपदा
३. छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा
४. अनिल देशमुख – गृह
५. दिलीप वळसे पाटील – उत्पादन शुल्क व कौशल्य विकास
६. धनंजय मुंडे – सामाजिक न्याय
७. हसन मुश्रीफ – ग्रामविकास
८. बाळासाहेब पाटील – सहकार व पणन
९. राजेंद्र शिंगणे – अन्न व औषध प्रशासन
१०. राजेश टोपे – आरोग्य
११. जितेंद्र आव्हाड – गृहनिर्माण
१२. नवाब मलिक – कामगार, अल्पसंख्याक विकास

तसेच काँग्रेसचे खातेवाटप पुढीलप्रमाणे:
१. बाळासाहेब थोरात महसूल
२. अशोक चव्हाण – सार्वजनिक बांधकाम
३. के सी पाडवी – आदिवासी विकास
४. विजय वड्डेटीवार – ओबीसी, खार जमिनी, मदत आणि पुनर्वसन
५. यशोमती ठाकूर – महिला बालविकास
६. वर्षा गायकवाड – शालेय शिक्षण
७. अमित देशमुख – वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतीक कार्य
८. सुनिल केदार – क्रीडा व युवक कल्याण, पशुसंवर्धन, दुग्धविकास
९. अस्लम शेख – वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे
१०. नितीन राऊत – ऊर्जा