Home महाराष्ट्र बुलढाणा जिल्ह्यात पुढील २ आठवडे संपूर्ण लॉकडाऊन – डॉ. राजेंद्र शिंगणे

बुलढाणा जिल्ह्यात पुढील २ आठवडे संपूर्ण लॉकडाऊन – डॉ. राजेंद्र शिंगणे

0

बुलढाणा जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुढील २ आठवड्यांसाठी कडकडीत बंद पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पालकमंत्री डॉ. एकनाथ शिंदे यांनी दिनांक १८ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जनता कर्फ्युचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

याशिवाय जिल्हा व पोलीस प्रशासनाला जनता कर्फ्युच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा ५,००० च्या पुढे जाऊन पोहचला आहे. त्यामुळे काही दिवस जिल्ह्यात लॉकडाऊन पाळण्यात यावे अशी मागणी स्थानिक संस्थांकडून केली जात होती. याच पार्श्वभूमीवर २ आठवड्यांच्या जनता कर्फ्युची घोषणा करण्यात आलेली आहे. मेडिकल, हॉस्पिटल, बँक, पेट्रोल पंप, दूध डेअरी हे वगळता इतर सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.