Home महाराष्ट्र ” नियमांचे पालन न झाल्यास, लॉकडाऊन वाढवून कडक करणार” – मुख्यमंत्री उद्धव...

” नियमांचे पालन न झाल्यास, लॉकडाऊन वाढवून कडक करणार” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधत सांगितले की, “कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नाही, आपण कोरोनाला हरवलेले नाही त्यामुळे घाईगडबड गर्दी न करता आपल्याला वर्दळीच्या ठिकाणांवर वावरावे लागेल. जर नियमांचे पालन झाले नाही तर मात्र लॉकडाऊन वाढवण्याशिवाय गत्यंतर नसेल”

“आपल्या राज्यातील लोक सुजाण आहेत, त्यामुळे ते गर्दी करून लॉकडाऊन वाढवण्याची वेळ येऊ देणार नाहीत. मी सर्वाना आवाहन करतो को सुरक्षित अंतर ठेवा आणि गर्दी करू नका”, असे ते यावेळी म्हणाले. सरकार जे काही निर्णय घेत आहे ते जनतेच्या हिताचे असून अर्थचक्र चालवण्यासोबतच नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. पुढे त्यांनी मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासोबत कुठलाही वाद झाला नसल्याचे स्पष्ट केले.

उपनगरीय रेल्वेसेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात यावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली असून ज्याप्रमाणे लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवण्यात येणार आहे तसाच लोकल सेवा सुरू करण्याचा विचार सुद्धा व्हावा असे आवाहन ठाकरे यांनी केले.

” मास्क वापरणे, हात वेळोवेळी स्वच्छ ठेवणे यासारख्या सवयी अंगी बाणवायच्या आहेत. गर्दी करायची नाही, झुंडीने फिरायचे नाही. संकट अजून टळलेले नाही. हे सर्व सांगून आणि काळजी घेऊनही परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसली, ती जीवघेणी होताना दिसली तर पुन्हा टाळेबंदी करावी लागेल”, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेवटी दिला.