Home महाराष्ट्र भक्तांना पेट्रोल मिश्रित चहा पाजून महाराज झाला फरार!

भक्तांना पेट्रोल मिश्रित चहा पाजून महाराज झाला फरार!

0

अमरावतीच्या दर्यापूर भागात प्रसाद म्हणून लाडू, बुंदी, शिरा देण्याच्या ऐवजी पेट्रोल वाला चहा देणारे महाराज आले आणि याचं चहाच्या प्राशनाणे ५ जणांची प्रकृती बिघडली आहे.
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मधील उंबरी रुसालपूर गावातील सुरेश घायसुंदर यांच्या घरी भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यासाठी अकोला जिल्ह्यातील अकोले जहांगीर गावातील प्रसिद्ध संभा उर्फ अंबादास महाराजांना बोलावले होते.भजनात भक्त गुंग झाले असतानाच महाराजांनी पेट्रोल वाला चहा प्रसाद म्हणून दिला. हा चहा पिताच ५ जणांना विषबाधा झाली. रुग्णांना अमरावती शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले असून पोलिसांनी महाराजविरोधात गुन्हा नोंदवला.

महाराज हा पेट्रोलयुक्त चहा नेहमीच देतात  व हा चहा पिल्याने बरेच आजार ठीक होतात असा भाबड्या भक्तांचा विश्वास आहे. ही घटना उघडकीस येताच अंबादास महाराज फरार झाला.पोलिसांनी पुढील चौकशी साठी एक पथक गावात पाठवले आहे.