Home महाराष्ट्र राज्यातील घरगुती वीज धारकांसाठी खुशखबर; वाढीव वीज बिलाबाबत सरकार लवकरच देणार मोठा...

राज्यातील घरगुती वीज धारकांसाठी खुशखबर; वाढीव वीज बिलाबाबत सरकार लवकरच देणार मोठा निर्णय!

0

महाराष्ट्रात एप्रिल महिन्यापासून लॉकडाऊन चालू असून या काळात घरगुती वीज धारकांना वाढीव वीज बिल आले असल्याच्या तक्रारी येत होत्या. अनेक राजकीय नेत्यांनी याबद्दल सरकारवर तसेच महावितरणावर टीका केली होती व बिल कमी न केल्यास आंदोलनाचा इशाराही दिला होता. त्यामुळे राज्य सरकारने या प्रकरणात लक्ष घालून वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी एक प्रस्ताव तयार केला आहे.

या प्रस्तावानुसार ग्राहकांना आलेल्या बिलातील ठराविक रक्कम राज्य सरकार भरणार असून त्यासाठी १ हजार कोटी रुपये देणार आहे. तसेच ग्राहकांनी २०१९ मध्ये अर्थात मागील वर्षी एप्रिल, मे, जून या महिन्यांत जेवढ्या विजेचा वापर केला आहे तेवढेच बिल यावर्षीच्या या तीन महिन्यांसाठी भरावे लागणार आहे. त्या रकमेच्या वरील बिल राज्य सरकार देणार असल्याचे मीडिया न्यूजवरून समजते.

टीव्ही 9 मराठीच्या मीडिया रिपोर्टनुसार १०० युनिट्स पर्यंतच्या वीज वापरावरील फरक राज्य सरकार भरणार आहे. अर्थात २०१९ ला एका ग्राहकाने एप्रिल महिन्यात ८० युनिट्स वीज वापरली असेल आणि यावर्षी १०० युनिट्सचे बिल आले असेल तर ग्राहकाला केवळ ८० युनिट्सचे बिल भरावे लागेल व वरील २० युनिटचे बिल सरकार भरेल असे राज्य सरकारनच्या या प्रस्तावात स्पष्ट केले आहे.

तसेच ज्या ग्राहकांनी आधीच बिल भरले असेल त्यांची वरची रक्कम पुढील बिलातून कमी केली जाईल असेही या प्रस्तावात सांगण्यात आले आहे. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात येणार असून त्यानंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे.