आधी मध्य प्रदेश आणि आता राजस्थान मध्ये काँग्रेसचे आमदार हे भाजपची वाट धरताना दिसत आहे, सचिन पायलट या राजस्थान मधील काँग्रेसच्या अगदी तरुण आणि तडफदार नेतृत्वाने भाजपा मध्ये जाण्याचे संकेत दिले आहेत, याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेस मध्ये सुद्दा असे होईल का असे विचारले असता, मंत्री जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे.
जयंत पाटील म्हणतात, ” महाराष्ट्रातील आघाडी सरकारचा एकही आमदार फुटणार नाही आणि फुटला तरी तो तिन्ही पक्षाच्या एकीसमोर कधीच निवडून येऊ शकणार नाही”, पालकांच्या या बोलण्यातून त्यांचा महाराष्ट्रातील आमदारांवर पक्षाच्या नेत्रत्वाचा अंकुश असल्याचा विश्वास दिसून येतो. २०१९ च्या निवडणुकांपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या बड्या नेत्यांची भाजप मध्ये भरती झाली होती, त्यामुळे आता जे उरले आहेत ते पक्षांशी एकनिष्ठ राहतील असा एकंदर त्यांचा समज असावा.
सत्ता स्थापना झाल्यावर पक्षांतर करता येते का? कायदा काय सांगतो?
भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर कित्येक वर्षे “आयराम-गयाराम” यांची पद्धत जोरात सुरू होती म्हणजेच निवडून आलेले आमदार खासदार सरकार स्थापन करण्या अगोदर किंवा नंतर पक्ष बदल करीत असत मात्र १९८५ मध्ये राजीव गांधी सरकारने घटना दुरूस्ती करून कलम १९० घालण्यात आले. या कलमानुसार निवडून आल्यानंतर पक्ष बदलल्यावर आमदारकी रद्द करण्याचे पूर्ण अधिकार हे संसदेला देण्यात आले. मात्र या नंतर सुद्धा ही पद्धत सुरूच आहे, नुकत्याच भाजपच्या ऑपरेशन कमळ ने ही पद्धत बंद न झाल्याचे सिद्ध केले आहे.