Home महाराष्ट्र मराठा आरक्षणासाठी या दिवशी असणार ‘महाराष्ट्र बंद’!

मराठा आरक्षणासाठी या दिवशी असणार ‘महाराष्ट्र बंद’!

0

काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने यावर्षी मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर केला. परिणामी मराठा समाजाला शैक्षणिक तसेच नोकरी संबंधात कुठल्याच सवलती तसेच आरक्षण यावर्षी मिळणार नाही असे स्पष्ट होते. यामुळे मराठा समाजामध्ये पुन्हा आरक्षणासाठी असंतोष निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या १० ऑक्टोबरला मराठा संघर्ष समितीने ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे.

कित्येक वर्षांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकले होते. परंतु मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे पुन्हा एकदा मराठा समाज पेटून उठला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये, शहरांमध्ये स्थगिती उठवण्यासाठी आंदोलने होत आहेत. कोल्हापूरातील मराठा संघटनांनी आपल्या मागण्यांचा प्रस्ताव मांडला आहे. त्यासाठीच १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद ठेवण्याचेही त्यांनी आवाहन केले आहे. या प्रस्तावात ‘आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे’, ‘आरक्षण मिळत नसल्याने निर्माण झालेला मराठा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फीचा प्रश्न शासनाने मार्गी लावावा’ व ‘याबद्दल अंतिम निर्णय होईपर्यंत सर्व भरती प्रक्रिया बंद ठेवाव्या’ अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.